आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दान्ची ओळख करुन दिली, बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला, आईने विचार दिले, ... ... बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृती शिकवली, आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्याच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे म्हणून तर माझी आज ओळख आहे. आई वडिलांना सगळेच सांभाळतात मग वृद्धाश्रमात आपल्याला म्हातारे का दिसतात.
देवाचा हि देव
जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा आई आठवते कारण देवा आधीही मदतीसाठी हाक आपण आधी आईलाच मारतो कितीही मोठे झालो आणि लांब आलो तरी घरची आठवण येतेच आयुष्यात कधी नव्हे तेव्हा mothers day चे महत्व कळून येते
आजही आठवते जेव्हा जेव्हा काही चूक केली आईने तेव्हा तेव्हा ती पकडली आणि विचारले जेव्हा तेव्हा मात्र उत्तर मी नाहीच दिले पण डोळ्यातील उत्तर मात्र तिनेच ओळखले
बाबांसमोर आमची बाजू आईनेच घेतली परत आता करणार नाहीस याचे वचन तिने नेहमी घेतले आज ते सर्व आठवते कारण पडतो मी एकटा इकडे आहेत मित्र भरपूर पण वाटते पडते काही कमी इकडे
आमच्यासाठी आजपर्यंत किती त्याग केला तिने आज जेव्हा जाणीव होते तेव्हा वाटते दुर्लक्ष्य आम्ही केले कसे जाऊदे झाले ते आता मात्र ठरवले इथून आपण सुधारायचे आता आईच्या सावलीतच उरलेले हे जीवन जगायचे
कधी कधी वाटते देवहि करत असेल आपला हेवा कारण जेव्हा जेव्हा अडकतो तो संकटात आठवतो तो कोणाला? त्याला वाटत असावे मीच बनवली आई पण प्रेम मात्र मला लाभले नाही म्हणून की हे अनुभवण्यासाठी तो मनुष्यरूपी जन्म तर घेत नाही?
Post a Comment