गंध हलके हलके या अल्बममधील 'धुंदीत प्रिया' या गाण्यासाठी मधुरा दातार हिला बिग ९२.७ या FM वाहिनीच्या 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे
या अल्बममधील नभं कसं दूर दूर.. हे गाणं खास चर्चेत आहे. या गाण्याबद्दल प्राजक्ताला विचारलं असता ती म्हणते, " हे गाणं खरतर चालीवर लिहिलं गेलयं. अभिजीतने मला चाल ऐकवली..
|
आणि मी विचार करत बसले! यावर काय लिहिणार? मग डोळे बंद करून विचार केला तेंव्हा डोळ्यासमोर मी कुठेतरी डोंगरावर उभी आहे आणि दुरून पावसाचे ढग येताना दिसतायत असं काहीसं चित्र आलं. मग "नभं कसं दूर दूर निळ-काळं घनभर दिसतय गं, मन माझं थेंब थेंब होऊन सारं भिजतय गं" हे शब्द सुचले. अभिजीतने नंतर ती संपूर्ण चाल आणि माझे शब्द म्युझिकसह मला पाठवले. मला ते इतकं आवडलं की त्यावेळेस अगदी मी घरभर नाचले होते!.. नंतर हे गाणं बेलाच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि तिने त्या गाण्याचं अक्षरश: सोनं केलय हे काही वेगळ सांगायची गरज नाही!"
|
Track List And Downloads
Post a Comment